मराठा समाज आक्रमक, नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगेवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज राणे यांचा सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला. गुरूवारी दुपारी मराठा समाजातील कार्यकर्ते उद्धव माने, अमोल पाठक, सोमनाथ माने, विठ्ठल बोरुडे, राहुल ढाळे, सुरेश मोरे, प्रशांत कदम, दिलीप गायकवाड आदी कार्यकर्ते नाईक चौकात जमा झाले व त्यांनी नारायण राणे मुर्दाबाद.. बेताल वक्तव्य करणाऱ्या राणेंचा निषेध असो, अशा घोषणा देत राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळत आपला संताप व्यक्त केला. या वेळी बोलताना माने म्हणाले की राणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे टीका केल्याने तमाम सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नारायण राणे व त्यांच्या दोन मुले हे सातत्याने जरांगे यांच्यावर टीका करतात यापुढे त्यांनी बेताल वक्तव्य केल्यास त्यांना जशास तसे आम्ही उत्तर देऊ यापुढे त्यांनी आपल्या बेताल वक्तव्यात सुधारणा केली नाही तर राज्यभर नारायण राणे यांना आम्ही सकल मराठा समाजातील कार्यकर्ते फिरू देणार नाही. मराठा समाज आज मनोज जरांगे यांच्या पाठीमागे आहे.त्यामुळे येणारा काळात राणेंना आमचा हिसका दाखवू असे शेवटी ते म्हणाले.