परळीत रास्ता रोको करत जरांगे पाटील यांच्या उपोषणला पाठींबा ; दोन तास वाहतूक खोळंबली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सगेसोयरे या शब्दाला ग्राह्य धरूनच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत पुन्हा उपोषण सुरू केले आहे.आज उपोषणाचा आठवा दिवस असून जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून परळीत रास्ता रोको आंदोलन केले गेले.या रास्ता रोको मुळे दोन तास वाहतूक खोळंबलेली होती.

परळीत बीड व गंगाखेड रस्त्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक – इटके कॉर्नर येथे सकाळी 10 पासून मराठा समाजाने रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले.यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आजचे रास्ता रोको आंदोलन हे सांकेतिक असून 20 तारखेला मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास एकही गाडी रस्त्यावर न फिरू देण्याचा ईशारा आंदोलकांनी यावेळी राज्य सरकारला दिला.या चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यात गाड्या लावून आंदोलकांनी वाहतूक थांबवल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.