मरीन लाईन्स स्थानकातील पुलावर हातोडा पडणार, लवकरच नवीन पुलाचे काम सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाइन स्थानकातील दक्षिणेकडील बाजूच्या पैदल पुलावर हातोडा पडणार आहे. पूल जीर्ण झाल्याने रेल्वेने तो 15 फेब्रुवारीपासून वापरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याच ठिकाणी नवीन पुलाच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून डिसेंबर अखेर तो पूर्ण होणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

मरीन लाइन स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2-3 आणि 4 वर जाण्यासाठी प्रवाशांना हा पूल सोयीचा होता. तसेच या पुलावरून सहजपणे स्थानकातून बाहेर पडता येते, मात्र सदरचा पूल जुना झाल्याने तो हटवण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाचा वापर बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकातील इतर दोन पुलांचा वापर करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.