
उत्तर प्रदेशातील मथुरेच्या कृष्णजन्मभूमी संदर्भात येथील शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. कोर्ट कमिश्नर नियुक्तीच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. सोमवारी न्यायालय सर्वेक्षण करण्यासाठी पॅनेलच्या स्थापनेवर निर्णय देईल, असंही सांगण्यात आलं आहे.






















































