Ratnagiri News – श्रीराम मंदिरातील चोरट्यांना कठोर शिक्षा होऊ दे! राजापुरात शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात चोरीप्रकरणी हिंदू बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी राजापूर तालुक्यातील खडपेवाडी येथील मारूती मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले. मारुती मंदिरात महाआरती, रामरक्षा व मारुती स्तोत्र पठण करून शिवसैनिकांनी आंदोलन केले.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी सांगितले की,अयोध्येतील राम मंदिर हे केवळ दगडांचे नव्हे, तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा, विश्वास आणि अस्मितेचे प्रतीक असल्याने त्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार किंवा स्वार्थाला स्थान असू शकत नाही. श्रीराम मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात त्यांनी केली.

यावेळी माजी जिल्हा संपर्क प्रमुख पांडुरंग उपळकर व उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस,मंदिर देवस्थानचे प्रमुख मंडळी संदीप इंदुलकर व पिंट्या दुधवडकर, शिवसेना तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार, तालुका संघटक प्राची शिर्के, उपतालुकाप्रमुख अभिजीत तेली, नाना गोटम, उपनगराध्यक्ष विनय गुरव, शहर संघटक विना विचारे, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष हातणकर, विभाग प्रमुख विलास नारकर, शांताराम तळवडेकर, आप्पा शिंदे, नरेश शेलार, माजी नगरसेवक अनिल कुडाळी, विभाग संघटक मीनाक्षी गुरव, धनश्री मांजरेकर, नगरसेविका नेहा तानवडे, नलिनी शेलार, उपविभाग प्रमुख सुभाष पावणाक, गणेश गिरकर, अमोल पाडेकर, विजय मांडवकर, रवी पैकडे, कोल्हे, बापू पाटकर, मंगेश गुरव, दशरथ दुधवडकर, युवा सेना तालुका अधिकारी सुभाष नवाले शिवसहकार तालुका प्रमुख प्रभाकर,कानडे , अक्षता पाटणकर, नलिनी कांजर, शाखाप्रमुख शांताराम गुरव, प्रतीक्षा मांजरेकर, गार्गी चिपटे, सुहासनी गुरव, प्रगती फोडकर, नलिनी शेलार, अमित मोंडे, शाखाप्रमुख संजय पेडणेकर, कृष्णा नागरेकर, प्रकाश डुकले, उमेश शेडेकर, गुरव तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.