महापौरांना हवाय खासगी सहाय्यक महिन्याला ५० हजार रुपये पगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी खासगी सहाय्यकाची मागणी केली असून त्याला पालिका दिला जाणार आहे. महिन्याला ५० हजार रुपये पगार प्रस्तावानुसार, रितू तावडे यांनी महापौर पदाचा कार्यभार ११ फेब्रुवारी २०२६ रोजी स्विकारल्यापासून विनिता ओरीगुंटा यांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे.

 

या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी १४ मे २०२६ रोजी प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. हे कंत्राट ११ महिन्यांचे आहे. ११ महिन्यांनंतर एक दिवसाचा तांत्रिक ब्रेक देऊन खासगी सहाय्यकाची पुन्हा नियुक्ती केली जाणार आहे. मात्र महापौर कार्यालयात सुमारे २५ कर्मचारी असताना खासगी सहाय्यकाची गरजच काय असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.