चर्चा तर होणारच! क्रिकेट देव अन् रॅपिंगच्या बादशाहमध्ये रंगला ‘सामना’, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉसच्या 16व्या हंगामाचे विजेतेपद पटकावल्यापासून एमसी स्टॅन हा रॅपर चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो, व्हिडीओ कायम चर्चेचा विषय ठरतात. लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने अनेक बड्या सिताऱ्यांना मागे टाकले आहे. घराघरात पोहोचलेल्या एमसी स्टॅन याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्यासोबत क्रिकेटचा सामना खेळताना दिसतोय.

एमसी स्टॅन आणि सचिन तेंडुलकर यांची नुकतीच भेट झाली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ एमसी स्टॅन याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. व्हिडीओ तो सचिनसोबत क्रिकेट खेळताना दिसतोय. अवघ्या काही वेळात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोघांचेही चाहते याला आयुष्यातील खास क्षण असल्याचे म्हणत आहेत.

गुरुवारी एमसी स्टॅन याने हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात एमसी स्टॅन काळ्या कपड्यात, तर सचिन लाल शर्ट आणि खाकी पँटमध्ये दिसतोय. एमसी स्टॅनने चेंडू हाती घेतला असून सचिन फलंदाजी करतानाही यात दिसतोय. ‘दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत गोलंदाजी. क्रिकेटचा देव. खूप कृतज्ञ. हक से #50forsachin’ असे कॅप्शन या पोस्टला एमसी स्टॅन याने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)