चोरलेल्या दुचाकीचे पार्टस् वेगळे करून विकायचा; चोर मेकॅनिक गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पार्क  केलेल्या दुचाकी चोरायच्या, मग त्या कामोठय़ातील गॅरेजमध्ये नेऊन त्याचे पार्टस् वेगवेगळे करायचे आणि ते पार्टस् विकणाऱ्या चोर मेकॅनिकच्या डोंगरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.  डोंगरीच्या चिंधी गल्लीतून सोहेल खटाव या तरुणाची आर-15 ही दीड लाखाची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी सोहेलने तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक संदीप बागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनकर, अंमलदार राजपुरे, कदम, मुल्ला, करपाते, गाढवे या पथकाने त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा दुचाकी चोर कोण ते स्पष्ट झाले. मग त्या आधारे पोलिसांनी वसीम इशरत अली मालीम (30) या मॅकेनिकला उमरखाडी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सोहेलची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या 11 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.