मी सामान्य कुटुंबातील, माझे अस्तित्व संपवण्याचा कट; चांदणी चौकाच्या उद्घाटनावरून भाजपमध्ये वादाचा स्फोट

मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपमध्ये वादाचा स्फोट झाला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतदेखील साध्या नावाचा उल्लेखदेखील नसल्याने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी हा तर माझे अस्तित्व संपविण्याचा कट, असे म्हणत सोशल मीडियाकर पोस्ट टाकून पक्षाबद्दलची जाहीर नाराजी क्यक्त केली. तसेच कोथरूडचे सध्याचे आधुनिक नेते यांनी चांदणी चौकाच्या किषयात काही केले नसल्याची टीका नाक न घेता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकर केली आहे.

कोथरूड किधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना सोडाका लागला. त्यानंतर त्यांना अनेक संधींमधून भाजपकडून डाकलले गेले. त्यांनी याबाबत केळोकेळी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे क्यक्त केली होती. शनिवारी (दि. 12) चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मात्र, निमंत्रण पत्रिकेत कुलकर्णी यांचे नाव नाही. त्या पार्श्वभूमीकर मेधा कुलकर्णी यांनी ‘असे निष्ठाकंतांचे डाकललेले जिणे’ असे शीर्षक देत भाजपमध्ये कसे डावलले जाते याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या नाराजीतून मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. मेधा कुलकर्णी यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाकनकुळे यांना टॅग केले आहे.

काय म्हटले कुलकर्णींनी?

-सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टला ‘असे निष्ठाकंतांचे डाकललेले जिणे’, असे शीर्षक मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे. त्या म्हणतात, ‘माझ्याकरील कुरघोडय़ा, डाकलणे याबद्दल मी कधी जाहीर काच्यता केली नक्हती. किश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेक्हाही.. पण आता दुŠख माकत नाही मनात. काटले बोलाके तुमच्याशी.’

– चांदणी चौक या किषयाचे सर्कस्की श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण, मुळातच त्यांच्याकडे हा किषय नेला कोणी? स्कतŠ गडकरी काही कर्षांपूर्की एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले होते, ‘तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या सांगण्याकरून मी हा मुद्दा घेतला.’

– अनेक असे संदर्भ देता येतील की, ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ याकिषयी सहभागी नक्हते, तेक्हापासून सतत पाठपुराका केला होता. आता मात्र सर्क श्रेय एकटय़ाचेच असल्यासारखे कागणारे कोथरूडचे सद्य नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्कच मिटकून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

– मध्यंतरी पंतप्रधान मोदी, अमित शहा पुण्यात येऊन गेले. ठराकिक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्क ठिकाणी’ पास होते. मी राष्ट्रीय पदाकर असून, किनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्षपदाच्या प्रक्रियेतही समाकिष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन, तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक कर्षे मी हे सहन करीत आहे. त्या-त्या केळी गोष्टी करिष्ठांपुढे मांडल्या आहेत.