
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा 90वा जयंती दिन बुधवार, 6 जानेवारी रोजी आहे. त्यानिमित्त स्व. माँसाहेबांना शिवतीर्थावर आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथेही भजन–कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त दरवर्षी शिवतीर्थावर होणारा सुगम संगीत तसेच भजनाचा कार्यक्रम यंदा होणार नसल्याचे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग राखूनच माँसाहेबांना पुष्पांजली अर्पण करण्यात येईल.
त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथे माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.































































