
महानगर गॅस लिमिटेडकडून (एमजीएल) सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या नागरिकांनी थोडासा दिलासा मिळाला आहे. ही दरकपात रविवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. नैसर्गिक वायूतील दरकपातीमुळे याचा वापर वाढेल आणि ग्राहकांनाही दिलासा मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.
मुंबई आणि परिसरात सीएनजीची किंमत 3 रुपये प्रतीकिलो आणि डोमेस्टिक पीएनजीची किंमत 2 रुपये प्रती एससीएम अशी कमी करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेत कंपनीने ही दरकपात केल्याचे म्हटले आहे. या दरकपातीमुळे सीएनजीची किंमत 76 रुपये प्रतीकिलो तर घरगुती वापरासाठी पीएनजीची किंमत 47 रुपये प्रती एससीएम अशी होणार आहे. ही दरकपात रविवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.




























































