
सामना ऑनलाईन । पणजी
दीर्घकाळ सुरू असलेल्या आजारपणामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सरकारवरील पकड ढिली झाली असून गोव्यातील भाजप आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अपक्ष मंत्री गोविंद गावडे यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांना केलेल्या शिवीगाळीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आज मगोपने गावडे यांच्या कृतीचा निषेध करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री पर्रीकर हे कडक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्यासमोर कनिष्ठ मंत्र्याने ढवळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शिवीगाळ करत आक्रमक भूमिका घेतल्याने सगळेच मंत्री आश्चर्यचकित झाले आहेत. ढवळीकर यांनी काल यावर जास्त काही भाष्य न करता केवळ नाराजी व्यक्त केली होती.

























































