
मिती क्रिएशन्स यंदा 16वा वर्धापन दिन साजरा करीत असून यंदाही संस्थेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गगनाला पंख नवे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शारीरिक अथवा मानसिक दिव्यांगावर मात करून आपापल्या क्षेत्रात शिखर गाठणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
निवेदिका ही स्वतःची ओळख जपत संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी काही करावे या उद्देशाने मिती क्रिएशन्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक उत्तरा मोने यांच्या संकल्पनेतून ‘गगनाला पंख नवे’ हा उपक्रम अस्तित्वात आला. 2015 साली मिती क्रिएशन्सच्या दशकपूर्ती निमित्ताने या पुरस्काराची सुरुवात झाली. सामाजिक कार्याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड देत ‘गगनाला पंख नवे’ पुरस्कार या कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केली.
आज सलग सहा वर्षे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. गेल्या सहा वर्षात अशा अनेक दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान मिती क्रिएशन्सने केला आहे. आतापर्यंत अवधूत गुप्ते, मधुरा वेलणकर, वैशाली सामंत, मृणाल पुलकर्णी, सोनाली पुलकर्णी, माजी सामाजिक न्यायमंत्री राजपुमार बडोले, माजी आमदार नितीन सरदेसाई, उद्योजक सचिन शिंदे यांची या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली.
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, समाजसेविका वर्षा पवार-तावडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी या व्यक्ती निवड समितीत कार्यरत असून डॉ. स्नेहलता देशमुख या निवड समितीच्या अध्यक्षा आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी हा कार्यक्रम डिजिटली होणार आहे. पुरस्कारासाठी दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी अर्ज भरून त्यासोबत आपले काही फोटो आणि माहिती मिती ग्रुपला ई-मेलद्वारे पाठवायची आहे. या वर्षीच्या ‘गगनाला पंख नवे’ पुरस्कारासाठी नाव नोंदवायचे असल्यास किंवा आपल्या आजूबाजूच्या अशा एखाद्या व्यक्तीचे नाव द्यायचे असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर आहे.
संपर्कः 9930115759. ई – मेल – [email protected]


























































