आमदार अपात्रतेची नोटीस; अजित पवार गटाला उत्तरासाठी हवी आणखी एक महिन्याची मूदत, विधानपरिषदेकडे मागणी

विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी अजित पवार गटाने अपात्रतेबाबतच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी मूदत वाढ मागितली आहे. अजित पवार गटाला नोटीशीला उत्तर देण्यासाठी आणखी 1 महिन्याचा वेळ वाढवून हवा आहे.

विधिमंडळाकडून आमदारांना 5 डिसेंबरला आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिन्याची मूदत वाढवण्याची मागणी केली आहे. शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रतेच्या नोटीसीला उत्तर सादर केले आहे.

शरद पवार गटातील एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरूण लाड यांना विधान परिषद आमदार अपात्रतेबाबत नोटीस देण्यात आली आहे. तर अजित पवार गटात अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, सतीश चव्हाण यांना नोटीस देण्यात आली आहे.