नियती हिशोब चुकता करतेच, जे पेराल तेच उगवते; क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

मराठवाड्याचा निकाल हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आत्मपरिक्षण लावणारा आहे. त्या त्या भागातल्या विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले गेले पाहिजे हिच मानसिकता मतदारांची असते. राष्ट्रवादीने विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांना झुंजवत ठेवले. राष्ट्रवादीने आता आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी दिला.

आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती. महायुतीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीच्या शिलेदारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला. यानंतर शिवसेनेत आलेले आलेले जयदत्त क्षीरसागर यांनी ‘दै.सामना’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नियती हिशोब चुकता करतेच

राष्ट्रवादीच्या वाताहतीबाबत भाष्य करताना आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले, नियतीने हिशोब चुकता केला आहे. जे पेराल तेच उगवते. यांनी कार्यकर्त्यांना झुंजवत ठेवले, लोकांची घरे फोडली, नियतीने यांची घरे वाहून नेली. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वाचा संपूर्ण मुलाखत – शिवसेनेमध्ये मी मोकळा श्वास घेतोय – आमदार जयदत्त क्षीरसागर