रोहयो गैरव्यवहारप्रकरणी मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षाला पाथर्डीत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात मनसेचा माझी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर हा फरार होता. मात्र उमेदवारांच्या प्रचारात खुलेआम फिरताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपी मनसेचा जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर याचा जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडकर पाथर्डीमधून पसार झाला होता. त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी 14 जानेवारीला अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता.

खेडकर हा 24 मार्च रोजी पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार फेरित सहभागी झाला होता. अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खेडकर याला अटक केली