मोबाईल पळवणारा गजाआड

नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळणाऱया सराईत चोराच्या ट्रॉम्बे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्या चोराकडून पोलिसांनी चोरीचे आठ मोबाईल हस्तगत केले आहेत. चितापँप येथे राहणारे मल्लिका नायडू (51) जनता कॉलनी समोरील लाला पान टपरीवर चहा पित बसलेले असताना अज्ञात चोराने त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.

याप्रकरणी नायडू यांनी ट्राँबे पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोउपनि शरद नाणेकर, कांचन आव्हाड तसेच रमेश धुमाळ, आव्हाड, सुद्रिक, लेंभे, देशमुख या पथकाने तपास सुरू केला. पथकाने खबऱयांच्या मदतीने आरोपीचा पह्टो मिळवला. मग पह्टोच्या आधारे शोधाशोध सुरू असताना आरोपी करबला मैदान परिसरात लपला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन मोईसअली शाहिदअली शेख ऊर्फ मोया (22) या चोराच्या मुसक्या आवळल्या. शेख सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यात दोन आयपह्नचाही समावेश आहे.