टार्गेट कोकण एक्स्प्रेसमधून महिलांचे दागिने चोरणारा गजाआड  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसने प्रवास करणाऱया महिलांचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱयाला दादर रेल्वे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. चकनलाल बाबुलाल सोनकर असे त्याचे नाव असून तो उह्याळ्यात चोऱया करण्यासाठी नुकताच मुंबईत आला होता. त्याच्या अटकेने काही गुह्यांची उकल होणार आहे.

तक्रारदार विमल लोकरे या गुरुवारी त्याच्या मुलासोबत कोकणकन्या एक्स्प्रेसने गोव्याला जात होत्या. एक्स्प्रेस दादर स्थानकातून सुटल्यावर चकनलाल हा विमल यांच्या डब्यात शिरला. माटुंगा स्थानक आल्यावर चकनलालने विमल यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून धावत्या एक्स्प्रेसमधून उडी मारून पळ काढला. विमल यांची सोनसाखळी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मुलाने चकनलालचा पाठलाग केला. पाठलाग करत असतानाच त्याचा मुलगा हा एक्स्प्रेसमधून खाली पडला. सुदैवाने त्याना काही गंभीर दुखापत झाली नाही.

सोनसाखळी चोरी प्रकरणी विमल यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. दादर रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त एम. मकानदार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अविनाश पोवार, सहायक निरीक्षक अर्जुन घनवट, शिंदे आदी पथकाने तपास सुरु केला. तपासासाठी पोलिसांची 12 पथके तयार केली. त्या पथकाने नागपाडा, पायधुनी, डी. बी. मार्ग येथील लॉज परिसरातील 100हून अधिक लॉजची पाहणी केली. अखेर चकनलालला मुंबई सेंट्रल येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सोनसाखळी चोरीची पोलिसांना कबुली दिली. अवघ्या 24 तासात सोनसाखळी चोरीच्या गुह्याची उकल करणाऱयात दादर पोलिसांना यश आले.

फोन गावी ठेऊन यायचा मुंबईत

चोरी केल्यावर जर फोन सोबत ठेवल्यास पोलीस पकडतील म्हणून तो मोबाईल गावीच ठेवत होता. तो दादर- पनवेल दरम्यान चोऱया केल्यावर टॅक्सीने दक्षिण मुंबईतील लॉजवर यायचा. कोणाला संशय येऊ नये म्हणून एकच दिवस तो लॉजवर राहत असायचा.

उन्हाळय़ातच करायचा चोऱया

चकनलाल हा फक्त मार्च ते मे या काळातच चोऱया करून तो पुन्हा उत्तर प्रदेशला जात असायचा. उन्हाळ्यात गर्मी असल्याने जनरल डब्यात महिला या खिडकीजवळ बसत असल्याने तो महिलांना टार्गेट करायचा. चकनलालला त्याच्या एका मित्राने एक्सप्रेसमध्ये चोऱया कशा करायचे हे शिकवल्यावर गेल्या 13 वर्षांपासून तो चोऱया करत आहेत.