
हिंदू देव-देवतांवरील आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी अटकेत असलेला आल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद जुबैरला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला असला तरी तो तुरुंगातच राहणार आहे. कारण जुबैरवर अन्य प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले सुरू आहेत.
त्यामुळेच आज जामीन होऊनही त्याला तुरुंगातच रहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. धार्मिक भावना भडकावल्या प्रकारणी न्यायालयाने 27 जून रोजी त्याला अटक केली होती.






















































