
आयसीसीच्या क्रमवारीत गोलंदाजीत टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने अव्वल स्थान पटकावले आहे. श्रीलंका व न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एक दिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. आयसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
🚨 There’s a new World No.1 in town 🚨
India’s pace sensation has climbed the summit of the @MRFWorldwide ICC Men’s ODI Bowler Rankings 🔥
More 👇
— ICC (@ICC) January 25, 2023
28 वर्षीय मोहम्मद सिराज याने या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकले आहे. सिराज सध्या 729 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर 727 हेझलवूड दुसऱ्या स्थानावर आहे.

























































