‘मंकीगेट’ प्रकरण हा माझ्या कारकीर्दीतील ‘काळा’ अध्याय

1974

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने ‘मंकीगेट’ प्रकरण हे कर्णधार म्हणून आपल्यासाठी सर्वात खडतर काळ होता आणि हे प्रकरण आपल्या कारकीर्दीतील काळा अध्याय असल्याची कबुली दिली आहे. टीम इंडियाच्या 2007-08 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱयात हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियन खेळाडू ऍण्ड्रय़ू सायमंडस्ला माकड (monkey) म्हटल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हरभजनने हे आरोप फेटाळले होते. आयसीसीच्या समितीसमोर झालेल्या सुनावणीत हरभजनसिंगला दोषी मानत तीन सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणावर अखेरीस पॉण्टिंगने आता आपले मौन सोडले आहे. ‘मंकीगेट’ हा कर्णधार म्हणून माझ्यासाठी सर्वात खडतर काळ होता. मंकीगेट प्रकरणात जे झाले त्यावेळी माझा माझ्यावर ताबा राहिला नव्हता, असे पॉण्टिंग म्हणाला.

डिवचलेल्या हिंदुस्थानने केले होते कांगारूंना पराभूत

कर्णधार रिकी पॉण्टिंग, मॅथ्यू हेडन आणि मायकल क्लार्क यांनी सायमंडस्च्या बाजूने साक्ष दिली होती, मात्र या सर्व गोष्टींचा खेळावर परिणाम झाल्याचे पॉण्टिंगने आता प्रांजळपणे कबूल केले आहे. या प्रकरणानंतर आम्ही पर्थमध्ये कसोटी सामना खेळला. हा सामना जिंकण्यासाठी आम्ही दावेदार होतो, परंतु या सर्व गोष्टींमुळे आम्ही हा सामना गमावला, अशी खंत पॉण्टिंगने व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या