बिहारमध्ये पुराचे थैमान, 24 तासात 14 जणांचा मृत्यू

46

सामना ऑनलाईन। पाटणा

बिहारमधील मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागात पूराने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासात राज्यात 14 जणांचा मृत्यू झाला असून पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 90 वर पोहोचली आहे. तर पुराच्या पाण्याच्या लोंढ्यात अख्खी मशिदच वाहून गेल्याची घटना घडली आहे.

घरे पाण्याखाली गेल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. मधुबनी जिल्ह्यात दौलतपूर येथे पाण्याच्या प्रवाहात मशिदच वाहून गेल्याची घटना घडली आहे. सरकारी आकडेवारीनुसार बिहारमधील 12 जिल्ह्यातील 102 ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे 66 लाखांहून अधिक नागरिकांना याचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासात राज्यात पुराने 14 जणांचा बळी घेतला आहे. घरे व शेती पाण्याखाली गेल्याने अनेकजण गाव सोडून गेले आहेत. तर पुराचे पाणी शाळेच्या इमारतींमध्येही शिरले आहे. यामुळे काही शिक्षकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मोकळ्या रस्त्यांवरच शाळा भरवली आहे. तर पुलावरून जाताना पाण्याच्या लोंढ्याने त्यावरील रस्ता खचून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या