बापरे! ‘या’ जिन्सच्या किंमतीत दिल्लीत 10 तर मुंबईत 3 घरं घेऊ शकता

246

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जिन्स कितीही म्हटली तरी आपण हजार ते दोन हजाराच्या मध्ये किंमत असणारीच घेतो किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी घ्यायची असली तर पाच हजारापर्यंत घेतो. तुम्ही भलेही मग महिन्याला 50 हजार कमाई करो किंवा 1 लाख, जिन्स घेताना आपण 1 हजार ते 5 हजारातीलच पाहतो. परंतु जगातील सर्वात महाग जिन्स किती रुपयांची माहिती आहे का? नाही ना. पण एक अशीही जिन्स आहे ज्याच्या किंमतीमध्ये तुम्ही मुंबईसारख्या शहरात एक घर खरेदी करू शकता.

जगातील सर्वात महाग जिन्स आहे सीक्रेड सर्कस ही. या जिन्सच्या मागच्या खिशावर हिरे लावलेले असतात आणि त्यामुळे याला खास लूक येतो. या जिन्सची किंमत जवळपास 1.3 मिनियन डॉलर अर्थात साडे आठ कोटींच्या आसपास एवढी प्रचंड आहे. या किंमतीमध्ये राजधानी दिल्लीसारख्या ठिकाणी 10 फ्लॅट खरेदी करू शकता, तर मुंबईमध्ये हायफाय भागात दोन तीन फ्लॅट तर नक्कीच खरेदी करू शकता.

जगातील आणखी काही महाग जिन्स पाहुया…
– डसॉल्ट एपारेल थ्रैस्ड डेनिम या जिन्सला खास लूक मिळावा म्हणून 13 वेळा धुतले जाते आणि रंग दिला जातो. याची किंमत 2.5 लाख डॉलर अर्थात अडीच कोटी रुपये एवढी आहे.

– लिवाइस स्ट्रॉस एंड को. 501 हा अमेरिकन ब्रान्ड आहे. या ब्रान्डच्या एका जिन्सची किंमत तब्बल 60 हजार डॉलर अर्थात 38 लाख रुपये आहे.

– एस्कॅडा कंपनीच्या स्टोअरमध्ये तुम्ही मनाप्रमाणे जिन्स बनवून घेऊ शकता. या ब्रान्डच्या एका जिन्सची किंमत आहे 10 हजार डॉलर अर्थात साडे लाखांच्या आसपास.

आपली प्रतिक्रिया द्या