खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अडचणीत वाढ, जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे न्यायालयाचे आदेश

bjp-mp-dr-jaysiddheshwar

भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर याप्रकरणी 420चा गुन्हाही दाखल असून, फेरतपासणीमुळे खासदारांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.

येत्या 28 जुलैला समितीसमोर पुन्हा सुनावणी होणार आहे. भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल सोलापूरच्या जात पडताळणी समितीने दिला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असून, न्यायालयाने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राची फेरतपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.