वीज बिल सवलतीपोटी सरकारकडून महावितरणला 390 कोटी रुपये मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणने 2020-21 या आर्थिक वर्षात औद्योगिक वीज ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवठा केला आहे. त्यानुसार महावितरणला राज्य सरकारकडून 390 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे थकीत वीज बिलामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील उद्योगांना शेजारील राज्यातील उद्योगांशी स्पर्धा करता यावी म्हणून सरकारने औद्योगिक वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत जाहीर केली होती. त्यानुसार महावितरणने औद्योगिक ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज उपलब्ध करून दिली आहे.