अजित पवार कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ब्रिच पॅण्डी रुग्णालयात उपचार घेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे बरे होऊन घरे परतले आहेत. घरी परतले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून ते काही दिवस विलगीकरणातच राहणार आहेत. कार्यालयीन कामकाज ते घरूनच करणार महत्त्वाच्या बैठका व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत.

अजित पवार यांनी ताप आल्यानंतर ते होम क्वॉरंटाइन झाले होते. 26 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राज्यातील कोटय़वधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसेच उपचार करणाऱया डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱया हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.