शेअर बाजार को‘रोना’! तासाभरात बुडाले 10 लाख कोटी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोनाने थैमान घातले असून जगभरातील अर्थव्यवस्थेनंतर हिंदुस्थानातही शेअर बाजार गडगडला आहे. शेअरधारकांनी आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच निर्देशांक 2900 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजारात 800 अंकांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे तासाभरात दहा लाख कोटी बुडाले आहेत.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, तरीही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्री करून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे बाजारात मोठी पडझड झाली आहे. आठवडाभरात दुसNयांदा बाजाराला लोअर सर्किट सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स 2718 अनेकांनी घसरला आणि 27197 अंकांपर्यंत खाली आला. निफ्टीने 590 अंकांची डुबकी घेतली आणि 8154 चा तळ गाठला. आज बाजारातील 150 हून शेअर्सने सार्वकालिक निचांकी स्तर गाठला. निफ्टीr स्मॉलकॅप 8.8 टक्क्यांनी घसरले. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांनी जवळपास दहा लाख कोटी गमावले. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल प्रचंड प्रमाणात घसरले आहे.

रुपयात ऐतिहासिक घसरण

शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमुळे सोमवारी डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच रुपया 76 च्या खाली गेला आहे. रुपयातील अवमूल्यनामुळे केंद्र सरकारच्या आयात बिलात मोठी वाढ होणार आहे. शेअर बाजारात मोठी पडझड झाली असून परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात पैसे काढण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे डॉलरची मागणी वाढली असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगच्या चलन विभागाच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेवा यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात रुपयाने 75.69 ने सुरुवात केली. त्यानंतर तो 76.15 च्या सार्वकालिक निचांकावर गेला. यामुळे नजीकच्या काळात वेंâद्र सरकारला आयातीसाठी जादा खर्च करावा लागणार आहे.

एकीकडे भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. दुसरीकडे कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल 26 डॉलरपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे रुपयावर दबाव निर्माण झाला असल्याचे जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेसचे मुख्य विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 48 हजार कोटींचे शेअर विक्री केले आहेत.