
फेसबुकवरून परदेशी महिलेशी झालेली ओळख अभिनेत्याला चांगलीच महागात पडली आहे. कमिशनच्या नावाखाली अभिनेत्याची 3 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूकप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गोवर्धनसिंह सिंग हे अभिनेते असून ते छोटय़ा मालिकांमध्ये काम करतात. तीन महिन्यांपूर्वी त्यांना थायलंड येथील एका महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ती सिंग याच्याशी बोलत असायची. तिने सिंग यांना एक अॅप्स पाठवले. त्या अॅप्सवर ट्रेडिंग केल्यावर जास्त कमिशन मिळते अशा भुलथापा मारल्या. त्यावर सिंग यांनी विश्वास ठेऊन ते अॅप्स डाऊनलोड करून लॉगिन केले.
लॉगिन केल्यावर सिंग यांना सुरुवातीला 1 लाख 89 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. कमिशनच्या नादात सिंग यांनी पैसे पाठवले. त्यानंतर सिंग यांनी त्या अॅप्सच्या कस्टमर केअरला पह्न करून कमिशनबाबत विचारणा केली. तेव्हा आणखी पैसे गुंतवल्यास जास्त कमिशन मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. कमिशनच्या मोहात सिंग यांनी आणखी 74 हजार रुपये गुंतवले.
पैसे पाठवल्यानंतर सिंग यांनी पुन्हा कस्टमर केअरला पह्न करून कमिशनबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना आणखी 1 लाख 12 हजार रुपये गुंतवल्यास जास्त कमिशन मिळेल असे सांगण्यात आले. हा प्रकार त्याना संशयास्पद वाटला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
























































