मुंबईतील गोवंडी झोपडपट्टीत भीषण आग, 15 झोपड्या जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या गोवंडी झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 15 झोपड्या जळून खाक झाली आहेत. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आले. यात कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

मुंबईतील गोवंडी झोपडपट्टीत आग लागल्याने 15 झोपड़्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत कोणी होरपळल्याची अद्याप तरी माहिती समोर आलेली आहे. या घटनेबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दलाला शनिवारी पहाटे तीन पंचावन्नला आग लागल्याची माहिती मिळाली. गोवंडी येथील आदर्श नगर परिसरातील बेंगनवाडीच्या ग्राऊंड प्लोअरवर 15 झोपड्या आणि पहिल्या मजल्यावरील घरांचे नुकसान झाले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, काही विद्युत तारा, प्लॅस्टिक, घरातील वस्तू, लाकडी फळ्या व इतर वस्तूही आगीत जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की आग विझवण्यासाठी चार अग्निशमन दल आणि अनेक मोठे टँकर सेवेत लावण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या आगीत कोणी होरपळल्याची माहिती मिळालेली नाही. ही आग नेमकी कशी लागली याबाबतही प्रयत्न केले जात आहे.