
सामना प्रतिनिधी, मुंबई
मराठी ‘बिग बॉस’फेम अभिजित बिचुकले यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. बिचुकले यांनी हायकोर्टात जामिनासाठी केलेली याचिका निकाली काढत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी खंडणीच्या गुह्याखाली सातारा सत्र न्यायालयात प्रलंबित असलेला खटला लवकर निकाली काढा असे आदेश दिले आहेत.
चेक बाऊन्स तसेच सात वर्षांपूर्वीच्या एका खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या बिचुकले यांना सातारा पोलिसांनी 21 जूनला अटक केली होती. सुटकेसाठी बिचुकले यांनी सातारा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता हा खटला अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर निकाल देण्यात येईल अशी माहिती हायकोर्टात आज दिली.


























































