आरेतील रस्त्यांचे काम लवकर सुरू करा, हायकोर्टाचा मिंधेंना आदेश

āआचारसंहितेचे भान ठेवा, राजकीय श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा दिखावा न करता आरे कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम लवकरात लवकर सुरू करा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी मिंधे सरकारला दिले.

आरे कॉलनीतील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत विनोद अग्रवाल यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करू

निवासी क्षेत्रात येणाऱया आरे मार्पेट ते मयूर नगर या दीड किमीच्या रस्त्यासह संपूर्ण 45 किमीच्या रस्त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणीला प्राधान्य दिले जाईल. तसेच सात किमी लांबीच्या रस्त्याचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी हमी सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मिलिंद मोरे आणि पालिकेतर्फे अॅड. जोएल कार्लोस यांनी दिली.