Corona Virus – मुंबईतील जुहू बीच बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले. सोमवारी दुपारी जुहू चौपाटीवर आलेल्या नागिरकांना पोलिसांनी माघारी पाठवून दिले. तेथे 60 पोलीस तैनात करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण हळुवार वाढू लागले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच सरकारी यंत्रणा उपाययोजना करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. असे असतानाच आज जुहू चौपाटीवर आलेल्या 400 हून अधिक जणांना पोलिसांनी माघारी पाठवले. त्यांना कोरोनाबाबत माहिती समजवून सांगितली. त्यानंतर नागरिक घरी गेल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले. जुहू चौपाटीवर दररोज सायंकाळी मोठय़ा प्रमाणात नागरिक येत असतात. रविवारी एक हजारहून अधिक नागरिक चौपाटीवर आले होते.