
सामना प्रतिनिधी, मुंबई
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी सकाळी अचानक उलट्या होऊ लागल्याने महापौर महाडेश्वर यांनी उपचारासाठी केईएम रुग्णालय गाठले होते.
तिथे उपचार घेऊन ते घरी गेल्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आपली प्रकृती आता ठणठणीत असल्याचे त्यांनी रुग्णालयातून परतल्यानंतर सांगितले.




























































