सिग्नल तोडल्यामुळे मोटारमनने केली आत्महत्या

मध्य रेल्वेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिग्नल तोडल्यामुळे एका मोटरमनने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मुरलीधर शर्मा असे त्या मोटरमनचे नाव आहे. राष्ट्रीय रेल्वे मजदूर यूनिअनचे जनरल सेक्रेटरी वेणू नायर यांनी  पनवेल 44 च्या सिग्नल कुर्ला S-29 वरून सिग्नल पासिंग आणि शर्मा यांच्या मृत्यूबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सिग्नलचे तोडल्यामुळे रेल्वे प्रशासन गंभीर कारवाई करणार या विचारानेच ते प्रचंड घाबरल असावेत. रेल्वेत मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत आणि लोको पायलट/मोटरमनना आमची मागणी पूर्ण करण्यासाठी ओव्हर ड्युटी तास भरावे लागतात असे नायर म्हणाले. ओव्हरशूटिंग आणि एसपीएडी प्रकरणांमध्ये  नोकरीतून कमी करण्याच्या भितीने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे. रेल्वे प्रशासनाच्या कठोर कारवाईच्या भितीने दुर्दैवाने मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी टोकाचा निर्णय घेतला असावा.

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, असे आरोप थेटपणे करणे अयोग्य असून ते याची सखोल चौकशी करतील असे सांगितले. तर रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे अतिक्रमणाचे प्रकरण आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असल्याचे सेंट्रल रेल्वेचे मुख्य प्रवक्ते डॉ स्वप्नील निला म्हणाले.