
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांच्या सहकार्याने गेल्या 23 डिसेंबर 2018 रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) घेतली होती. त्या परीक्षेसाठी काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना त्यांचे रखडलेले मानधन मिळणार आहे.
‘पेट’ परीक्षा ज्या महाविद्यालयांमध्ये झाली तेथील केंद्र प्रमुख, परीक्षक, शिपाई, आयटी समन्वयक, परीक्षा सहाय्यक आदींना मानधन देण्याचे विद्यापीठ विसरून गेले होते. ‘मुक्ता’ शिक्षक संघटनेने ही बाब परीक्षा संचालक आणि विद्यापीठाच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर विद्यापीठाने हे मानधन देण्याबाबत परिपत्रक काढले.24 लाख रुपये इतकी या मानधनाची रक्कम होती. संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आपले मानधन मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन ‘मुक्ता’ संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी केले आहे.

























































