आज मै उपर, क्योंकी मास्क है नीचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस अनेकदा हटके पोस्ट शेअर करून जनजागृती करत असतात. त्यांच्या या पोस्टला नेटिजन्सकडून खूप भरभरून प्रतिसाद मिळतो. आताही मुंबई पोलिसांची नवीन पोस्ट चर्चेत आलेय. या पोस्टमध्ये अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्या ‘खामोश’ सिनेमातील प्रसिद्ध गाणे ‘आज मै उपर… आसमां नीचे’ या गाण्याचा कमालीने वापर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी म्हटलंय, ‘आज मै उपर, क्योंकी मास्क है नीचे..’ कोरोनाला खामोश करण्यासाठी मास्कचा वापर योग्य पद्धतीने करा, असा संदेश मुंबई पोलिसांनी या पोस्टमधून दिला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मास्कचा वापर करावा, असे वारंवार सांगूनही काही लोक बेफिकीरपणे वागतात. त्यांच्यासाठी पोलिसांनी असा वेगळ्या पद्धतीने संदेश दिला आहे.