
मुंबईच्या 12 ऑक्टोबर रोजी खंडित झालेल्या वीज पुरवठय़ाची चौकशी करण्यासाठी सरकारने सात सदस्यांची तांत्रिक चौकशी समिती नेमली होती. त्यानुसार समितीने आपले काम पूर्ण करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना 30 पानी अहवाल सादर केला आहे. हा अहवाल लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले होते. त्याची दखल घेत सरकारने यामागील करणे शोधून उपाययोजना सुचविण्यासाठी मुंबई आयआयटीच्या अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमली होती. त्यानुसार समितीचे सचिव व महावितरणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांनी उर्जामंत्र्यांकडे अहवाल सादर केला आहे.





























































