
हिंदुस्थानी नौदलाच्या आयएनएस बेतवा या युद्धनौकेवर असणाऱया नौसैनिकाने स्वतŠवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. रमेश चौधरी असे त्याचे नाव असून घडल्या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.
रमेश हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून तो आयएनएस बेतवा युद्ध नौकेवर कर्तव्यास होता. सुटी निमित्त गावी घरी गेलेल्या रमेशने नुकतीच डय़ुटी जॉईन केली होती. कर्तव्यावर असतानाच आज सकाळी रमेशने स्वतŠवर गोळी झाडून आत्महत्या केली. हा प्रकार एका नौसैनिकाच्या लक्षात येताच त्याने याची माहिती वरिष्ठाना कळवली. रमेश ला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. घडल्या प्रकाराची माहिती नौदलाने कुलाबा पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळी रायफल आढळून आली असून रमेशच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.



























































