दक्षिण मध्य मुंबईत सेवा सप्ताह; 350 दिव्यांगांना सायकल वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मध्य मुंबईत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत वृक्षारोपण मोहीम ,गरजूंना अन्नधान्य आणि सुरक्षा संचाचे वितरण, फळांचे वाटप, 350 दिव्यांगांना सायकलचे वाटप, स्वच्छता मोहीम, नेत्र तपासणी चष्मा वाटप शिबीर आणि रक्तदान शिबिर असे उपक्रम विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्यावतीने करण्यात आले.

14 ते 20 सप्टेंबर सेवा सप्ताहादरम्यान दरररोज दक्षिण-मध्य मुंबईत वृक्षारोपण, गरजूंना अन्नधान्य आणि सुरक्षा संचाचे वितरण आणि 16 सप्टेंबर रोजी धारावी, अँटॉप हिल, वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यांमधील कोविड योद्धा पोलीस बंधू भगिनींना सन्मानपत्र आणि कोविड सुरक्षा किटचे वाटप केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांत 350 दिव्यांगांना तीन चाकी सायकल व सेफ्टी किट्सचेही वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे दक्षिण-मध्य मुंबईतील वडाळा, सायन-कोळीवाडा, धारावी, माहीम, चेंबूर आणि अणुशक्ती नगर या सहा विधानसभा मतदार संघांमध्ये रक्तदान शिबीरही घेण्यात आले.