मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

उन्हाळी सत्रातील परीक्षांचे निकाल वेळेवर लागावे यासाठी महाविद्यालयांनी सर्व शिक्षकांची नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ते मंगळवारी मुंबई व उपनगर जिह्याच्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या बैठकीत बोलत होते.

2019च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 25 मार्च 2019 पासून सुरू होत असून या संदर्भात परीक्षा अर्ज, परीक्षातील सुधारणा, मूल्यांकनातील नवीन बदल, शिक्षकांसाठी मोबाईल ऍप, नॅडच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची नोंदणी, मूल्यांकनांसाठी शिक्षकांचा सहभाग व तंत्रज्ञानात असलेल्या बदलाची माहिती देण्यासाठी जिल्हानिहाय महाविद्यालयातील प्राचार्यांच्या बैठका परीक्षा विभाग घेणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे होणाऱ्या प्राचार्यांच्या बैठकीलाही कुलगुरू मार्गदर्शन करणार आहेत.