देणार का यांना मुंबई? शिवसेनेचा ट्विटरवर मुंबईकरांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारबद्दल मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांवरही हा संताप व्यक्त करून तमाम मुंबईकरांना ‘देणार का यांना मुंबई?’ असा सवाल शिवसेनेच्या मीडिया विभागाने केला आहे.  ‘सगळय़ात जास्त टॅक्स देऊनही मुंबईला अर्थसंकल्पात स्थान नाही. यांना मुंबई फक्त लुटायला हवी. खच्चीकरण करायला हवी. संपवून टाकायला हवी आहे. देणार का यांना मुंबई?’ असा कळकळीचा सवाल शिवसेना सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक अनघा आचार्य यांनी ट्विटरवरून मुंबईकरांना विचारला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही पोस्ट केला आहे. ‘से नो टू बीजेपी’ या मोहिमेखाली त्यांनी मुंबईकर भाजपला मुंबईत एकही जागा देणार नाही, असेही म्हटले आहे.