
गॅस गळती, सिलिंडर स्फोट होऊन होणारी जीवित-वित्तहानी रोखण्यासाठी मुंबईकरांना ‘सुरक्षेचे धडे’ दिले जाणार आहेत. गॅस गळती झाल्यास घ्यावयाच्या खबरदारीबाबतही प्रशिक्षण दिले जाईल. पालिकेच्या अग्निशमन दलासह वितरक, ‘एचपीसीएल’, ‘बीपीसीएल’कडून नागरिकांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती पालिकेचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी दिली.
आगी रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. ‘मॉकड्रील’च्या माध्यमातून बचावकार्याचे धडेही दिले जात आहेत. सोसायटय़ांसोबतच रुग्णालये, नार्ंसग होम, शासकीय-खासगी आस्थापनांच्या ठिकाणी मॉकड्रील केले जाते.
पालिकेकडून वितरकांना पत्र
दुर्घटना टाळण्यासाठी एचपीसीएल, बीपीसीएल पंपन्यांसह सिलिंडर वितरण करणाऱया वितरकांना पत्र देण्यात आले आहे. यानुसार उपक्रमात पंपन्यांच्या सहभागातून आणि लोकल डिलरसाठी लेक्चर देणे सुरू करण्यात आले आहे. z हे वितरक ग्राहकांना सिलिंडर कसा वापरावा, गॅस गळती झाल्यावर काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करणार आहेत. सिलिंडर वितरकांना आतापर्यंत सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जात आहे.































































