सोलापुरातील चिप्पा मार्केटमध्ये तरुणाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर महापालिकेच्या चिप्पा मार्केटमध्ये एक रुणाचा डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव निष्पन्न झाले नसून, या परिसरात भीतीचे वातावरण आहे. सांगोल्यात एका तरुणाचे गुप्तांग कापून निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच शहरात हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे.

अशोक चौक परिसरात महापालिकेचे चिप्पा मार्केट आहे. सकाळी 30-35 वयोगटाच्या एका तरुणाचा चेहरा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळला. बाजूला हत्येसाठी वापरलेली फरशी आढळली. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या तरुणाची ओळख पटली नसून, जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चिंता किंदीक तपास करत आहेत.