
सामना प्रतिनिधी । लखनौ
मुस्लीम लीग हा एक व्हायरस आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तसेच हा व्हायरस ज्याला लागला तो वाचला नाही असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. काँग्रेसला याची लागण झाल्याचे त्यांनी ट्विटवर म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना राहुल गांधींनी शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसने केरळमधील मुस्लीम लीगशी युती केली आहे. या शक्तिप्रदर्शनावेळी मुस्लीम लीगच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आणि पक्षाचे झेंडेही या प्रचारादरम्यान वापरले. त्याचा संदर्भ घेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, ““मुस्लीम लीग हा एक विषाणू आहे. या विषाणूची लागण कुणाली झाली तर तो वाचू शकत नाही. याची लागण सध्या काँग्रेसला झाली आहे. जर काँग्रेस जिंकली तर काय होईल याचा विचार करा”. हा विषाणू संपूर्ण देशात पसरेल असा इशाराही त्यांनी दिला.
मुस्लिम लीग एक वायरस है। एक ऐसा वायरस जिससे कोई संक्रमित हो गया तो वो बच नहीं सकता और आज तो मुख्य विपक्षी दल कांग्रेस ही इससे संक्रमित हो चुका है।
सोचिये अगर ये जीत गए तो क्या होगा ? ये वायरस पूरे देश मे फैल जाएगा।
— Chowkidar Yogi Adityanath (@myogiadityanath) April 5, 2019
1857 च्या उठावाचा संदर्भ देताना योगी म्हणाले की, “1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात मंगल पांडेसह संपूर्ण देश इंग्रजांच्या विरोधात लढला होता. नंतर हा मुस्लीम लीगचा विषाणू आला आणि देशाची फाळणी झाली. आता हे संकट पुन्हा देशावर आले आहे. हिरवे झेंडे पुन्हा फडकत आहेत. काँग्रेसला मुस्लीम लीगचा विषाणूची बाधा झाली आहे.” असे म्हणून योंगीनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
1857 के स्वतंत्रता संग्राम में मंगल पांडे के साथ पूरा देश अंग्रेजों के खिलाफ मिल कर लड़ा था, फिर ये मुस्लिम लीग का वायरस आया और ऐसा फैला कि पूरे देश का ही बंटवारा हो गया
आज फिर वही खतरा मंडरा रहा।
हरे झण्डे फिर से लहर रहे।
कांग्रेस मुस्लिम लीग वायरस से संक्रमित है, सावधान रहिये।— Chowkidar Yogi Adityanath (@myogiadityanath) April 5, 2019






















































