
गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण राहाता तालुक्यात पावसाने मोठा हाहाकार माजवला असून ऐन सणासुदीच्या तोंडावर जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्याचे देखील अतोनात नुकसान झाले असतांना बुधवार दि १९ ऑक्टोबर रोजी रात्री पुन्हा एकदा संपूर्ण तालुक्यात ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व ओढे नाले ओसंडून वाहू लागले आहे.
राहाता येथील तहसील कार्यालय, विज वितरण कार्यालयाला पाण्याचा वेढा पडला असून अनेक घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याच नुकसान झालय तर नागरिकांना घराबाहेर निघणेही मुश्किल झालय. राहाता – पिंपळस हद्दीतील ओढ्यास पुर आल्याने महामार्गाला नदीच स्वरूप प्राप्त झाल्याने वाहतुक विस्कळीत झालीय. परिसरात काढणी केलेली सोयाबीन पिक पाण्यात गेलंय तर अनेकांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर नैसर्गिक संकट ओढवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने ओढ्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय.
शिर्डी पुन्हा जलमय , उपनगरातील घरांमध्ये पावसाचे पाणी. परतीच्या पावसाने शिर्डीला अक्षरक्ष: झोडपलय. ढगफुटी सदृष्य पावासामुळे शिर्डी जलमय झाली असुन रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झालय.ओढे नाल्यांना पुर आल्याने विवीध शासकीय कार्यालयांना पाण्याचा विळखा बसलाय. लक्ष्मीनगर , श्रीरामनगर , साईनाथ रुग्णालय , कोते वस्ती आदी भागांमधील घरात पाणी घुसल्याने संसार उघडयावर आले आहेत.लक्ष्मीनगर परिसरातील घरांमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल.यावर्षी पाचव्यांदा लक्ष्मीनगर पाण्याखाली गेलय. प्रशासनाने ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली मात्र काही धनदांडग्यांचे अतिक्रमण ओढयावर असल्याने ती अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी संतप्त नागरिकांनी केलीय.

























































