नागपूर – शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळला, एका रुग्णासह महिलेचा मृत्यू

500

नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये स्लॅब कोसलून एका रुग्णासह महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृति स्थिर आहे. मृतांमध्ये देवराव बागडे (66) आणि वनिता वाघमारे (39) यांचा समावेश आहे. देवनाथ हे सावनेर, तर वनिता या नागपूर शहरातील भांडेवाडी परिसरातल्या रहिवासी होत्या.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील चर्मरोग बाह्यरुग्ण विभागाचा स्लॅब गुरूवारी सायंकाळच्या सुमारास कोसळला. याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चर्मरोग बाह्यरुग्ण विभागात नातेवाईकाला बघायला आलेल्या वनिता वाघमारे आणि रुग्ण देवराव बागडे यांचा समावेश आहे.

स्लॅब अंगावर पडल्याने देवराव यांचा जागीच मृत्यू झाला. देवराव बागडे हे आजारी होते आणि या रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. त्यांना भेटायला दोन महिला नातेवाईक आल्या होत्या. त्यावेळी ते या सज्जा खाली बसले असताना सज्जा त्यांच्या अंगावर पडला. तेव्हा देवराव यांचा जागीच मृत्यू झाला. त्या तिघांनाही अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.जी. गायकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या