समृद्धी वाघिणीच्या बछ़ड्यांना मिळाली नावं, नामकरण सोहळा दणक्यात पार पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील समृध्दी वाघिणीने दीड महिन्यापूर्वी चार बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचा नामकरण सोहळा आज शनिवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत पार पडला. एक नर आणि तीन मादी असलेल्या या बछड्यांची अनुक्रमे कूश, अर्पिता, प्रगती, देविका अशी नावे ठेवण्यात आली आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.