
मिंधे सरकार हे बिल्डर आणि पंत्राटदारांचे सरकार आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने केली जाते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याला आज दुजोरा दिला. मिंधे सरकारने एका व्यक्तीला राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल मंत्रालयासमोरील निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाट किमतीला पंत्राटाचे वाटप करतो, असा आरोप पटोले यांनी केला आहे. या दलालाचा लवकरच भंडापह्ड करू, असा इशाराही त्यांनी दिला.
नाना पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार (ईडीए) म्हणजेच येडय़ा सरकारकडून जनतेच्या घामाचा पैसा पंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरू आहे, असे ते म्हणाले.
मंत्रालयात सर्वसामान्यांना रोखणे ही हुकूमशाही
सुरक्षेच्या नावाखाली मंत्रालयात कडक उपाययोजना केल्या गेल्या. सर्वसामान्यांवर कठोर निर्बंध लादले गेले आहेत. दलालांना मात्र मोकळे रान आहे. मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर सुरू आहे, असे पटोले म्हणाले. मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकूमशाही आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. जनता हीच खरी राजा असून तिचा सन्मान करायला शिका, असे ते म्हणाले.
n कंत्राट कोणाला द्यायचे हे निर्मल इमारतीतला हा दलाल ठरवतो. या दलालाचा पर्दाफाश येणाऱया अधिवेशनात काँग्रेस करणार आहे.
भारतमातेपेक्षा नरेंद्र मोदी मोठे आहेत का?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नगर शहरातील दौऱयात भारत मातेच्या घोषणा दिली जात असताना या घोषणा थांबवून बावनकुळे यांनी नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. त्यावरही पटोले यांनी निशाणा साधला. भारतमाता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.




























































