
सामना प्रतिनिधी । मुंबई
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नाणार रिफायनरी प्रकल्प हटविण्याची मागणी करत संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते प्रेक्षक गॅलरीत घुसले. ‘नाणार हटवा, कोकण वाचवा’, अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सभागृहात उपस्थित होते. दरम्यान, नाणार विरोधात प्रेक्षक गॅलेरीत घोषणाबाजी करणाऱ्या दोन पुरुष, एका महिलेला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे.

























































