
सामना ऑनलाईन, वर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्याविरोधात जोरदार बॅटिंग केली. शरद पवार हे पुतण्याकडून हिट विकेट झाले आहेत, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. शरद पवार हे माजी कृषीमंत्री होते. ते देशातील ज्येष्ठ नेते आहेत. ते कोणतेही काम विचार करून करतात, असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. पंतप्रधान व्हावं अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले होते. पण काही दिवसांत ते म्हणाले की मी राज्यसभेतच खूश आहे, असं म्हणत मोदींनी त्यांच्यावर टीका केली.
सध्या त्यांच्या पक्षासमोर अनेक समस्या आहे. पक्षात कौटुंबिक लढाई सुरू आहे. पवारांचा पुतण्या पक्षावर कंट्रोल मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांचे उमेदवार ठरत नाही. शरद पवार हे पुतण्याकडून हिट विकेट झाले आहेत. राष्ट्रवादीतून ज्येष्ठ नेत्यांना निवृत्त करण्याचे काम सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला लक्ष्य करताना मोदी म्हणाले की ही आघाडी कुंभकर्णासारखी आहे. पैसे खातात आणि सहा महिन्यांसाठी झोपी जातात. मोदींनी भाषणात सर्वाधिक लक्ष्य केले ते अजित पवार यांना. शेतीसंदर्भातील प्रश्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी काय उत्तर दिले ते आठवतंय ना. विसरू नका. तसेच मावळमध्ये शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबाराचा उल्लेख मोदींनी यावेळी केला.
राहुल गांधींचे नाव न घेता टिकास्त्र
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसचा कट उघडकीला आला आहे. देशाने आता आघाडीला धडा शिकवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ते आता मैदान सोडून पळायला लागले आहेत. जिथे हिंदूंची संख्या अधिक आहे असे मतदार संघ सोडून जिथे हिंदूंची संख्या कमी आहे, अशा ठिकाणांहून ते निवडणूक लढवत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदींनी दिला जोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर बरसताना त्यांनी ‘आझाद मैदान’मधील रझा अकादमीच्या दंगल घडविण्याच्या घटनेचा उल्लेख केला. या घटनेवेळी आरोपींवर कारवाई करण्यास आघाडी सरकारकडून टाळाटाळ सुरू होती, तसे आदेशच त्यांना देण्यात आले होते, असे मोदी यावेळी म्हणाले. तसेच आपल्या हिंदु दहशतवाद हा शब्दच काँग्रेसने जन्माला घातल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात मंत्रीपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असा शब्द उच्चारल्याची त्यांनी आठवण करून दिली. हजारोंवर्षांचा इतिहास हिंदू सहिष्णु असल्याचे सांगतो. इथे राज्य करून देखील इंग्रजांनी हिंदू धर्मियांवर अरे आरोप केले नाहीत ते आरोप काँग्रेस आघाडीने केले असल्याची त्यांनी आठवण करून दिली. अशा काँग्रेस आघाडीला निवडून देऊ नका असे आवाहन मोदींनी यावेळी केले.
पाहा भाषणाचा व्हिडीओ-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले काही ठळक मुद्दे-
- इंग्रज इतिहासकारांनीही हिंदू कधी हिंसक झालेल्याचे उल्लेख केलेल नाहीत.
- गेल्या हजारो वर्षांचा इतिहास आहे, हिंदुने कधी दहशतवाद केल्याची घटना ऐकिवात आहे का?
- या देशातल्या कोट्यवधी लोकांवर हिंदू दहशतवादी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे
-
PM in Wardha: Iss desh ke croron logo par Hindu atankwad ka daag lagane ka prayaas Congress ne hi kiya hai. Hazaro saal ka itihaas, Hindu kabhi aatankwad kare aisi ek bhi ghatna hai kya? Angrez itihaaskaro ne bhi kabhi Hindu hinsak ho sakta hai is baat ka zikra tak nahi kiya hai. pic.twitter.com/WRsVC8O9Gb
— ANI (@ANI) April 1, 2019
- याचं उत्तर एकच त्यांच्या मतपेटीत लपलं आहे. मतपेटीच्या राजकारणासाठी आघाडी कोणत्याही थऱाला जातील.
- तेव्हाही आघाडी सरकारने हेही ठरवलं होतं, की जे आझाद मैदानात हिंसाचार करतील त्यांच्याव कारवाई होऊ नये.
- ही तीच आघाडी आहे, ज्यांनी आझाद मैदानात शहीद स्मारकाची तोडफोड करण्याची आणि हिंसाचार करण्याची सूट दिली होती.
- पुरावे मागणाऱ्यांना, देशाच्या सैन्याला अपमानित करणाऱ्याला, शहिदांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणार ना
- तुम्हाला सबूत हवे आहेत की देशाच्या सपुतांचा अभिमान हवा आहे.
- जे हिंदुस्थानचे वीर आहेत, त्यांची गरज आहे की जे पाकिस्तानमध्ये वीर बनलेत ते हवे आहेत.
- मी आज विदर्भाला विचारतो, तुम्हाला कोणं हवं?
- सगळं जग हिंदुस्थानला मानतं, पण काँग्रेस आणि त्यांचे साथीदार अशी भाषा करत आहेत.
- आपल्या वीरांनी सीमापार करून शत्रूच्या घरात घुसून दहशतवाद्यांना संपवलं, पण हे पुरावे मागत आहेत.
- महाराष्ट्रातील विदर्भातले अनेक सुपुत्र आज देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत आहेत. पण, आघाडीच्या भ्रष्टाचाराने त्यांचाही अपमान केला आहे.
- आम्ही खूप इमानदारीने पाण्याचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत.
- योजना योग्य वेळात पूर्ण केल्या जातील, हे माझं आश्वासन आहे.
- वर्ध्यात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येणार आहे.
- शरद पवार 10 वर्षं कृषिमंत्री बनून केंद्रात होते. तरीही ही परिस्थिती आहे.
- या योजनेअंतर्गत 99 प्रलंबित सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. यातील 26 योजना एकट्या महाराष्ट्रतल्या आहेत.
- महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणली गेली आहे.
- अनेक योजना अजूनही प्रलंबित आहेत. त्यांना पूर्ण करण्याचा विडा तुमच्या या प्रधानसेवकाने उचलला आहे.
- हेच त्यांनी पाणी, सिंचन यांसारख्या योजनांबाबती केलं, शेतकऱ्यांची लूट केली.
- त्यांनी कर्जमाफीसारख्या योजना आणून फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या.
- ज्यांनी सत्तर वर्षं गरीबाला गरीब बनवून ठेवलं ते गरीबाचं भलं कधीही करू शकले नाहीत.
- हा पैसा शेतीच्या कामाला उपयोगी येईल
- पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत महाराष्ट्रातल्या सव्वा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो रुपये जमा झाले आहेत
- वनउत्पादनाच्या किमतीची वाढ
- कापूस, तूर, सोयाबीनसह अनेक पिकांना योग्य हमीभाव देण्याचं कामही या चौकीदाराने केलं आहे.
- आता हे थांबायला हवं. तुमचा हा चौकीदार तुमच्या प्रश्नांना दूर करण्यासाठी इमानदारीने दिवसरात्र मेहनत करत आहे.
- वंशवादाला खतपाणी घालण्यामुळे एनसीपी नेत्यांना जबरदस्तीने निवृत्त करत आहेत.
- आता त्यांच्या खोट्या आश्वासनांची पोलखोल झाली आहे, आता ते स्वतः पुतण्याच्या हातून हिट विकेट
- त्यांच्या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण पवारांना काहीही फरक पडला नाही.
- स्वतः एक शेतकरी असून पवार शेतकऱ्यांना विसरले.
- मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी झगडत होते, तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळीबाराचे आदेश दिले होते.
- अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राचा शेतकरी जेव्हा धरणातल्या पाणीटंचाईविषयी विचारणा करायला गेला तेव्हा त्या काय उत्तर मिळालं. ते इथे उच्चारताही येत नाही.
- पैशांची भूक भागवण्यासाठी जे क्षेत्र मिळेल तिथे भ्रष्टाचार करतात.
- जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा सहा सहा महिने झोपा काढतात, सहा महिन्यांतून एखादा जागा होतो आणि भ्रष्टाचार करून पुन्हा झोपी जातो.
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी म्हणजे कुंभकर्णासारखी
- कुटुंबातल्या वादांमुळे इतरांमध्ये संभ्रम वाढत आहे.
- पवार यांचे पुतणे हळूहळू पक्षावर नियंत्रण आणत आहे. म्हणून तिकीट वाटपातही अडचणी येत आहेत.
- पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी निसटत चालला आहे.
- राष्ट्रवादीत सुरू असलेलं कौटुंबिक युद्ध ही त्यांची सर्वात मोठी समस्या आहे.
- या हवेने भल्याभल्यांना मैदान सोडून पळायला भाग पाडलं आहे.
- शरद पवार यांनाही हवेचा रोख कुठे वाहतो हे कळलं आहे.
- त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं, पण एक दिवस म्हणाले मी राज्यसभेतच खूश आहे.
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी असं बोललं जातं की, ते कोणतंही काम विचारपूर्वक करतात.
- तुमच्या याच आशीर्वादांनी भल्याभल्यांचे हेतू विफल केले आहेत.
- विदर्भाच्या भूमीवर तुमचं प्रेम हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.
- गांधी, विनोबा भावे, बाबा आमटे यांच्या संदेशांचा काँग्रेस अपमान करत आहे
- तुमच्यासाठी शौचालय हा मस्करीचा विषय असेल, माझ्यासाठी सन्मानाचा आहे.
- दिवसभर त्यांना त्रास झाला तरी सहन करावा लागत होता, त्यांच्या अब्रुलाही यात धोका होता.
- अनेक गावांमध्ये माता भगिनींना दिवस उजाडण्याआधी शौचालयात जावं लागत होतं. किंवा मग अंधार झाल्यानंतर त्या जंगलात जात होत्या.
- जेव्हा मी शौचालयाचा चौकीदार बनतो, तेव्हा कोट्यवधी माता-भगिनींच्या अब्रुचीही चौकीदारी करतो.
- शौचालयाचा चौकीदार ही तुमची शिवी माझ्यासाठी दागिना, मी त्याचा अभिमानाने स्वीकार करतो
- ही भाषा सफाईच्या कामात स्वतःला झोकून देणाऱ्यांचा हा अपमान आहे.
- दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्याने टीका केली की मोदीने फक्त शौचालयाची चौकीदारी केली आहे.
- काँग्रेस गेली अनेक वर्ष साफसफाईच्या कामात व्यग्र असलेल्या चौकीदारांचा अपमान करत आहे.
- काँग्रेसने याचं पालन किती केलं तेही तुम्हाला चांगलं माहीत आहे.
- गांधी आणि विनोबा हे स्वच्छतेप्रति किती आग्रही होते ते तुम्हाला माहीत आहे.
- मी माझ्या कामाचा हिशोब तर मी देणारच आहे, पण ही संधी देण्यासाठी मी दोन्ही हात जोडून तुम्हाला धन्यवाद देतो
- कारण, पाच वर्षांपूर्वी तुमची सेवा करण्याचं सौभाग्य मला दिलं आहे.
- मी आज तुमच्याकडे काही मागणार आहे, पण त्यापूर्वी गांधी आणि विनोबांच्या या भूमीतून मी संपूर्ण राज्य आणि देशाच्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो
- मी आजवर जे करू शकलो, त्याच्यामागे तुमचे आशीर्वाद, प्रेरणा आणि समर्थन आहे.
- रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा
- मतदानापूर्वीच जे प्रेम व्यक्त केलं आहे, ते पाहून काँग्रेस आणि एनसीपी आज रात्री झोपू शकणार नाहीत,
- एसीत बसून सल्ला देणाऱ्यांना हे कळणार नाही की, 40-42च्या तापमानात इतके लोक प्रचाराला आले आहेत.
- या आधी मी वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह सर्व विदर्भाच्या नागरिकांचे आभार
- वर्धाच्या महान भूमिपासून महाराष्ट्रात प्रचारसभेला प्रारंभ करणं हे माझं भाग्य
- त्यासाठी संशोधकांचे मनःपूर्वक अभिनंदन
- आज शेकडोंच्या संख्येने याची देही याचि डोळा हे प्रक्षेपण जवळून पाहिलं.
- देशाला विज्ञानाची गोडी लावण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय
- अंतराळ उपग्रहाचं प्रक्षेपण सामान्यही जवळून पाहू शकणार, यापूर्वी फक्त काही निवडक लोकच ते पाहू शकत होते.
- पीएसएलव्हीचं प्रक्षेपण करून 5 देशांच्या उपग्रहांना अंतराळात प्रक्षेपित केलं गेलं.
- इस्रोने काही वेळापूर्वीच ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
- सर्वात आधी अंतराळ संशोधकांचं आदरपूर्वक अभिनंदन
- महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पवित्र भूमीला माझा साष्टांग दंडवत – पंतप्रधान
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात
- पण, देश चालवण्यासाठी 56 पक्षांची आघाडी नाही, तर 56 इंचांची छाती लागते
- मोदींना हरवण्यासाठी महाराष्ट्रात 56 पक्षांची आघाडी केली आहे.
- विदेशात एप्रिल फूल साजरा करा, इथे तुम्ही कोणाला एप्रिल फूल बनवू शकत नाही.
- पण हा नवीन हिंदुस्थान आहे, हा एप्रिल फूल बनणार नाही.
- एका पक्षाने गेली 50 वर्षं लोकांना एप्रिल फूल बनवलं.
- काही देशांमध्ये 1 एप्रिल हा एप्रिल फूल म्हणून साजरा होतो.
- मागच्यापेक्षा अधिक प्रेम वर्धावासीयांकडून हवं आहे.
- वर्ध्याचं रुपडं बदलण्याचं काम भाजप करत आहे.
- आमच्या सरकारने 498 कोटींची कर्जमाफी केली.
- पिकविम्यात दुप्पट फायदा आणि शेतकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली.
- एकट्या वर्धा जिल्ह्यात 50 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली
- विदर्भाच्या सुपुत्राला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली, त्यासाठी पंतप्रधानांचे आभार
- वर्ध्यातून काँग्रेस विसर्जित झालं.
- त्यानंतर महात्मा गांधींचं स्वप्न साकार झालं.- मुख्यमंत्री
- मोदींची पहिली सभा वर्ध्यातून घेण्याचं कारण 2014 ची पहिली सभाही इथेच झाली होती.
- भारतमाता की जय म्हणत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात.
- नरेंद्र मोदी यांचे वर्ध्याची खासियत असलेला सुती हार घालून स्वागत
- महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यात
- सभास्थानी नरेंद्र मोदी यांचे आगमन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार
- महात्मा गांधी यांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार आहे. सेवाग्राम येथील बापूकुटीला मोदी भेट देणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 1 एप्रिल रोजी वर्धा येथे सभा होणार आहे. तर ऍड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची नागपुरातील इंदोरा परिसरात सभा होणार आहे. त्यामुळे दोन राजकीय नेते काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष लागले आहे.






























































